आनंदाची बातमी या 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर GR पाहा

Nuksan bharpai:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. सन 2020 ते 2022 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे, ही एक राज्यातील शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे.

नुकसान भरपाई 2020 ते 2022
Nuksan bharpai:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. सन 2020 ते 2022 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे, ही एक राज्यातील शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे.

•नुकसान भरपाई अशा शेतकऱ्यांना मिळणार:-

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे तसेच मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आता शासनाने जीआर काढलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील एकूण 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

•नुकसान भरपाई का दिली जाते:-

शेतकरी बंधूंनो नुकसान भरपाई का दिली जाते तर शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्यापासून काढणीपर्यंत अनेक नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना नेहमी सामना करावा लागतो. अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे व मालमत्तेचे नुकसान होत असते ते भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना एक मदत व्हावी त्यासाठी राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असतात. शेती पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे, ढगफुटी मुळे तसेच कमी पावसामुळे व लाल्या, सोयाबीन पिकावरील येलो मोझाईक अशा वेगवेगळ्या कारणामुळे शेती पिकाचे नुकसान होत असतात ते भरून काढण्यासाठी राज्य सरकार द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना एक मदत एक अनुदान स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात येत असते.

•सन 2020 ते 2022 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त किती अनुदान:- 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक- 21/02/2024 च्या शासन निर्णयानुसार निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली एकूण रुपये रक्कम 10664.94 लक्ष रुपये (एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्यांनो हजार रुपये फक्त) ऐवजी रुपये 11239.21 लक्ष रुपये (एकशे बरा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त) अशी एकूण रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

https://viralfarming.com/chana-market-today/ 28 मार्च रोजीचें हरभरा बाजार भाव पाहा

•नुकसान भरपाई मिळणार:-

1- सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाला नुकसान भरपाई मिळणार.

2- शेत जमिनीचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार.

3- नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णत: क्षत्रिग्रस्त झाले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तू करिता अर्थसहाय्य मिळणार.

4- सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये मृत जनावरांना मदत मिळणार.

5- कुक्कुटपालन शेडच्या नुकसानी करिता मदत मिळणार.

6- दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करिता क्षेत्र/घर पाण्यात बुडालेले असल्यास नुकसान भरपाई मिळणार.

7- घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास किंवा पूर्णतः क्षत्रिग्रस्त झाली असल्यास अनुदान मिळणार.

8- हस्तकला / हातमाग कारागीर / बारा बलुतेदार यांना मदत मिळणार.

9- मत्स्य व्यवसायाच्या नुकसानी करिता मदत मिळणार.

10- दुकानदार टपरीधारक यांना मदत मिळणार.

11- राहत शिबिर मदत मिळणार.

•एकूण 26 जिल्हे कोणते?

1- रायगड 2- सिंधुदुर्ग 3- ठाणे 4- रत्नागिरी 5- पालघर 6- मुंबई उपनगर 7- भंडारा 8- गोंदिया 9- गडचिरोली 10- चंद्रपूर 11- नागपूर 12- वर्धा 13- जळगाव 14- नाशिक 15- धुळे 16- नंदुरबार 17- अहमदनगर 18- छञपती संभाजीनगर 19- जालना 20- नांदेड 21- हिंगोली 22- परभणी 23- बीड 24- धाराशिव 25- लातूर 26- अमरावती या 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *