June 2024 Weather Forecast;- आज पासून पुढील 48 तास राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तरी राज्यातील शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. (Panjab dakh havaman andaj).
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा आहे. तसेच दिनांक/ 9 आणि 10 जुन रोजी म्हणजे पुढील 72 तास राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन नदी, नाले वाहतील असा जोरदार पावसाचा अंदाज डख यांनी दिला आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
पेरणी कधी करावी :- शेतकरी मित्रांनो वरील जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होईल तर काही भागात मध्येम हलका पाऊस होईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी साधारण जमिनीत एक इत वल गेल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा असा सल्ला डख यांनी दिला आहे.
तसेच पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार दिनांक/ 09, 10, 11 व 12 जुन या पुढील चार दिवसात राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यामध्ये अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
आज दिनांक/ 08 जुन पासून पुढील 72 तास मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर राज्यातील अनेक भागात दिनांक/ 09 जुन पासून 14 जुन पर्यंत भाग बदलत बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागात कमी तर काही भागात जास्त अश्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे ज्या भागातील जमिनीत वल साधरण एक इत गेली आहे अश्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी चालेल. परंतु ज्या भागात पाऊस कमी आहे अश्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असा इशारा पंजाबराव डख यांनी दिली आहे.
दिनांक/ 09 ते 14 जुन राज्यातील या जिल्ह्यांना होणार मुसळधार जोरदार पाऊस. त्यामध्ये खालील जिल्हे आहेत.
पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या जिल्ह्यातील अनेक भागात नदी नाले वाहतील असा जोरदार पाऊस होणार आहे.
नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात अती मुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यातील काही नदी नाले वाहतील असा अंदाज असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी धन्यवाद..