Soyabean seed treatment:- सोयाबीन बीज प्रक्रिया संपूर्ण माहिती..
शेतकरी मित्रांनो सोयाबीन बियाणे खूपच नाजूक असतात त्यामुळे सोयाबीन बियाणे जमिनीत पेरणी केल्यानंतर त्या बियान्यावर बुरशीजन्य रोगांचा, किडीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे त्या बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट दिसून येते. पेरणी पूर्वी सोयाबीन बियाण्यावर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जिवाणू संवर्धक ची बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे.
बीज प्रक्रिया म्हणजे काय:- बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यावर पेरणी पूर्वी कीटकनाशक, बुरशीनाशक व जिवाणू संवर्धक चा कवच दिला जातो ज्यामुळे सोयाबीन पिकात खोड कीड, मूळ कुज या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो व उत्पादन वाढते त्यामुळे बीज प्रक्रिया नक्की करावी.
बीज प्रक्रिया करण्याची पद्धत:- बीज प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम बियाणे झाडाखाली किंव्हा रुम मध्ये सावलीत तपडावर टाकून घ्यावे व नंतर सर्वप्रथम बुरशीनाशक चा थर ठेऊन थोडा वेळ सुकून दयावे व नंतर कीटकनाशक बीज प्रक्रिया करून घ्यावी व त्यानंतर शेवटी जिवाणू संवर्धक बीज प्रक्रिया करावी व बियाणे लगेच पेरणीसाठी वापरावे.
1- रासायनिक बुरशीनाशक बीज प्रक्रिया:-
रासायनिक बीज प्रक्रिया करण्यासाठी थायरम किंव्हा कार्बेन्डाझिम या रासायनिक बुरशीनाशक ची 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करत अस्तांनी बियाण्यास चांगला लेप बसेल याची काळजी घ्यावी, त्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी वापरू शकता परंतु पाण्याचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
2- जैविक बुरशीनाशक बीज प्रक्रिया:- ट्रायकोडर्मा बीज प्रक्रिया करण्यासाठी 05 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून घ्यावे व नंतर बियाणे पेरणी साठी वापरावे.
3- रासायनिक कीटकनाशक बीज प्रक्रिया:- Thiamethoxame 30 fs या रासायनिक कीटकनाशक ची बीज प्रक्रिया करण्यासाठी 05 मिली प्रती किलो बियाण्यास चोळावे. म्हणजे सोयाबीन खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
4- जिवाणू संवर्धक बीज प्रक्रिया:- रायझोबियम हे सोयाबीन पिकास नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू आहे. त्यामुळे सोयाबीन बीज प्रक्रिया करण्यासाठी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास रायझोबियम चोळावे व बीज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच बियाणे पेरणी साठी वापरावे धन्यवाद..