Krushi Takrar WhatsApp Helpline Number:- कृषी तक्रार व्हॉट्सअँप हेल्पलाईन नंबर कृषी विभाग, महाराष्ट्र शासन च्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावरून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी विभाग अंतर्गत कृषी तक्रार व्हॉट्सअँप हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.
शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे असून राज्यातील शेतकऱ्यांची खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी सुरू झालेली आहे त्यामुळे कृषी केंद्र मार्फत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये तसेच शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके अधिक दराने विक्री करू नये त्यासाठी महाराष्ट्र शासन, कृषी विभागाने कृषी तक्रार व्हॉट्सअँप हेल्पलाईन नंबर शेतकऱ्यांना तक्रारीसाठी दिला आहे.
खरीप हंगामात खते, बियाणे, कीटकनाशके जास्त भावाने विक्री करून कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असेल तर त्या कृषी सेवा केंद्राची तक्रार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 9822446655 हा व्हॉट्सअँप हेल्पलाईन नंबर दिला आहे.
कृषी सेवा केंद्र म्हणजे खत, बियाणे, कीटकनाशके विक्री करणारी केंद्र विशिष्ट कंपनीचे बियाणे किंव्हा खत खरेदी करण्यासाठी फोर्स करत असेल किंव्हा खत, बियाणे, कीटकनाशके जास्त दराने विक्री होत असेल तर तुम्ही त्या कृषी सेवा केंद्राची खरेदी पावती कृषी तक्रार व्हॉट्सअँप हेल्पलाईन नंबर वर व्हॉट्सअँप करून त्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करू शकता.
कृषी सेवा केंद्र अधिक दराने विक्री किंव्हा विशिष्ट कंपनीचे बियाणे खते किंव्हा बोंगस बियाणे विक्री करत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता परंतु ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे ती तक्रार पुराव्यासह असावी तरच कठोर कारवाई केली जाईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. महत्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे त्या शेतकऱ्यांचे नाव गुपित ठेवले जाईल व कृषी विभागामार्फत केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद..