PM KISAN YOJANA:- सलग तिसऱ्यांदा नरेंद मोदी पंतप्रधान होताच शेतकऱ्यांनी सर्वात मोठी खुशखबर.
देशातील शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत मिळावी त्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यात वार्षिक 6000 रुपये जमा केले जातात, प्रत्येकी 4 महिन्याला 2,000 रुपये पत्र शेतकऱ्यांचा बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जातात. आत्ता पर्यंत पीएम किसान योजनेचे एकूण 16 हप्ते शेतकऱ्यांचा खात्यात जमा झालेले असून लवकरच 17 वा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे.
Central Government:- नरेंद्र मोदी केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच शेतकऱ्यांसाठी पहिला पाऊल उचला आहे. पिएम किसान योजनेचे एकूण 16 हप्ते शेतकऱ्यांचा खात्यात वितरित केले गेले आहे तर 17 व्या हप्त्याचे वितरण लवकरच व्हावे त्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच 17 व्या हप्त्याच्या फाईल वर Signature (स्वाक्षरी) केली आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद मोदी पंतप्रधान झाले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली योजना पिएम किसान योजना सुरू राहणार असून देशातील शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 6,000 रुपये तर परतेकी चार महिन्याला 2,000 रुपये असे एकूण वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहे.
•2024 लोकसभा BJP साठी ठरली कठीण:-
कापूस आणि सोयाबीन पिकाला कमी भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खर्च ही निघालेला नाही त्यामुळे BJP सरकारवर देशातील अनेक शेतकऱ्यांची नाराजी असल्यामुळे 2024 लोकसभा BJP साठी अटीतटीची लढत ठरली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय पिएम किसान योजना अंतर्गत घेतला आहे.
•Pm Kisan 17th Installation:- पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार.
पिएम किसान योजना अंतर्गत एकूण देशातील जवळपास 09 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असून जवळपास एकूण 20,000 कोटीच्या फाईल वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे.
पिएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे वितरण करण्याअगोदर विशेष मोहीम:-
दिनांक 05 जुन तर 15 जुन या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांनी KYC पूर्व करावी तसेच आधार लिंकिंग करून घ्यावे त्यासाठी राज्य सरकारकडे सूचना दिल्या आहेत. तसेच 15 जुन पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असून दिनांक 05 जुन ते 15 जुन दरम्यान शेतकऱ्यांनी KYC तसेच आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे लागणार आहे, त्यांनतर लाभार्थी झालेल्या शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात 17 व्या हप्त्याचे पैसे 2,000 रुपये वितरित करण्यात येणार आहे.
•17 व्या हप्त्याचे वितरण कधी होणार:-
शेतकऱ्यांची KYC आणि आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 15 जून पर्यंत विषश मोहीम राबवण्यात येत असून, लवकरच म्हणजे जुन महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंव्हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 17 व्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे धन्यवाद.