Mukhyamantri Ladki Bahin Yojana:- खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता वयाची अट वाढली असून 65 वर्षापर्यंत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रती महिन्याला 1.5 हजार रुपये देण्यासाठी अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घोषणा केली असून योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना प्रति महिन्याला 1.5 हजार रुपये देऊन महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना राज्यातील लाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना वेगवेगळ्या अटी घालण्यात आल्या होत्या परंतु त्या घातलेल्या अटीमुळे राज्यातील अनेक महिला या योजनेपासून अपात्र राहणार असल्यामुळे आता त्यात काही बदल करण्यात आले आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
•मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे अटी आहेत.
1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना वयाची अट ही 21 ते 65 पर्यंत आहे म्हणजे 21 ते 65 वय वर्ष गटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
2- आपल्या कुटुंबातील 21 वय वर्षा पुढील एका अविवाहित महिलेला सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.
3- पिवळे रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही तसेच केशरी रेशन कार्ड धारकांना सुद्धा उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.
4- अर्ज करण्यासाठी तारीख वाढवली असून आता 15 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख केली आहे.
5- 05 एकर जमिनीची आट देखील रद्द करण्यात आली आहे.
6- दिनांक. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना 01 जुलै 2024 पासूनच दर माह 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
7- लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला वरीलपैकी कोणतेही ग्राह्य धरण्यात येणार आहे धन्यवाद.