Akot cotton rate:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्म या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आज दिनांक 01 एप्रिल 2024 आर्थिक वर्षाचा सुरुवातीचा दिवस आहे आणि या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट या बाजार समितीमध्ये कापूस दरामध्ये चांगलीच वाढ आपल्याला बघायला मिळाली आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट या ठिकाणी कापसाला सर्वाधिक 8385 रुपये असा उच्चांकी दर 2024 वर्षातला मिळाला आहे.
Akot kapus bajar bhav today:- कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट कापूस बाजार भाव..
मागिल 8 ते 10 दिवसात कापूस दरात मोठी घट दिसून आली असून क्विंटल मागे 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल मागे दर कमी झाले होते, परंतु आज 01 एप्रिल रोजी कापूस भावात चांगलीच वाढ झाली असून आज कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट अकोला या बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक 8385 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
Manwat kapus bajar bhav today:- कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस बाजारभाव..
कृषी उत्पन्न बाजार समिती, मानवत या ठिकाणी आज कापूस दरात वाढ झाली असून दिनांक 01 एप्रिल रोजी कापसाला 8055 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
Deulgaon raja kapus bajar bhav:-
बाजार समिती – दे राजा
शेतमाल – कापूस
आवक – 300 क्विंटल
दिनांक – 01 एप्रिल 2024
कमीत कमी दर – 7000 रू
सर्वसाधारण दर – 7750 रू
जास्तीत जास्त दर – 8005 रू
देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये फरदड कापसाला 7000 रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 8005 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
Akola kapus bajar bhav:-
बाजार समिती – अकोला
शेतमाल – कापूस
आवक – 35 क्विंटल
वान – लोकल
दिनांक – 01 एप्रिल 2024
कमीत कमी दर – 7425 रू
सर्वसाधारण दर – 7425 रू
जास्तीत जास्त दर – 7425 रू
अकोल्यात कापसाला सर्वाधिक भाव 7425 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद…