April Havaman Andaj:- मार्च महिन्याची सुरुवात आणि शेवट अवकाळी पावसाने झाली असून एप्रिल महिन्यातही सुरवातीलाच अवकाळी पावसाने सावट असणार आहे. त्यामुळे कांदा काढणीस आला असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे.
पंजाबराव डख हे महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक असून ते वेळोवेळी राज्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज देऊन शेतकऱ्यांचे शेती पिकाचे होणारे नुकसान कमी करण्याचे काम करत आहे.
पंजाबराव डख यांनी मार्च महिन्याचा सुरुवातीला दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस बरसला तसेच मार्च महिन्याच्या शेवटी 29, 30 व 31 मार्च चा हवामान अंदाज त्यांचा तंतोतंत खरा ठरला असून कल दिनांक 30 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा, मध्ये महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात विजेच्या कडकडाट होऊन हलका पाऊस बरसला आहे.
एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने सावट राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे. दिनांक 31 मार्च म्हणजे आज पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्ये महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो परंतु दिनांक 01 एप्रिल तर 05 एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे होऊन तापमानाचा पारा वाढणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस पेक्षा तापमान गेल्याची नोंद झाली असून दिनांक 01 ते 05 एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण आजुन तापणार आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. तसेच दिनांक 06, 07, आणि 08 एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसणार आहे त्यामुळे कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस अधिक राहण्याची शक्यता आहे, मार्च महिन्यात शेवटी झालेल्या पावसापेक्षा एप्रिल महिन्यात होणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक अवकाळी असणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे..