Bhavantar Yojana; सोयाबीन व कापूस अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार…
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन जीआर निर्गमित केला असून या शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित 5 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. (Bhavantar Yojana 2024)..
नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती विषयक व हवामान विषयक माहितीसाठी आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
शेतकरी मित्रांनो काल दिनांक/ 29 जुलै 2024 रोजी 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यासाठी नवीन जीआर निर्गमित केला आहे. पण अश्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे? पाहा सविस्तर माहिती.
• अनुदान वितरित कसे होणार?
मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदान जीआर निर्गमित झाल्यानंतर राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हे अनुदान डीबीटी मार्फत निर्गमित होणार असून त्यासाठी अर्ज करावा लागणार का. तर त्याच बद्दल थोडक्यात माहिती पाहू.
महत्वाचं :- सन 2023 खरीप हंगामातील ई पीक पाहणी ॲप/ पोर्टल द्वारे सोयाबीन व कापूस लागवडीची नोंद केलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
जर तुम्ही सोयाबीन व कापुस पिकाची 20 गुंठ्या पेक्षा कमी क्षेत्रावर लागवडीची नोंद केली असेल तर अशा शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपये मिळणार आहे. जर तुमच्याकडे सन 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस पिकाची लागवडीची नोंद ॲप किंव्हा पोर्टल द्वारे केलेली असेल तर दोन हेक्टर मर्यादित हेक्टरी 5000 रुपये मिळणार आहे.
जर तुमच्याकडे कापूस व सोयाबीन 2 हेक्टर असेल आणि तुम्ही ॲप किंव्हा पोर्टल द्वारे एक एकर लागवडीची नोंद केली असेल तर जेवढी नोंद आहे तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ॲप किंव्हा पोर्टल द्वारे ई पीक पाहणी केलेल्या लागवडीच्या क्षेत्रानुसार अनुदान मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..