Cotton market- जागतिक बाजारात मागील काही दिवसात कमी झाले होते परंतु पुन्हा एकदा जागतिक बाजारात कपाशीचे दर (Cotton rate) वाढले आहे. त्यामुळे राज्यातील कापूस बाजार भाव सुध्दा वाढत आहे.
देऊळगाव राजा, अकोट, मानवत, सेलू, परभणी व अकोला बोरगाव मंजू राज्यातील प्रमुख कापूस खरेदी करणाऱ्या बाजार पेठेत कापसाचे दर उंचावले आहे. वरील बाजार समिती मध्ये कापसाचे दर उंचावले असून 8200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच कापूस व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
International market:- आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले असून याचा परिणाम देशातील कापूस बाजार पेठेत दिसून येणार आहे. जागतिक बाजारात कापूस दर वाढ होताच देशातील कापूस दरात मागील 15 दिवसात तब्बल 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल भाव वाढले असून आता सरासरी कापसाचे भाव 7200 ते 8200 रुपये प्रति क्विंटल कापसाने टप्पा गाठला आहे.
कापूस विक्री कधी करावा:-
शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांनी जवळपास 75 टक्के कापूस विकला आहे म्हणजे फक्त देशातील 25 टक्के शेतकऱ्यांकडे कापूस राहिलेला आहे. त्यामुळे या कापूस भाव वाढीचा फायदा फक्त 20 ते 25 टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. तर ज्या स्थानिक गावातील व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करून साठा केला असेल अश्या व्यापाऱ्यांना कापूस भाव वाढीचा फायदा जास्त होणार आहे.
शेतकरी मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव वाढत्या दिशेने सुरू आहे तसेच देशातील बाजारात देखील कापूस भाव अनेक दिवसापासून वाढत आहे. वाढत असलेले भाव लक्षात घेऊन कापूस विक्री शेतकऱ्यांनी करावी.
कापूस आवक घटली मागणी मात्र वाढली:-
शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यापासून तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापूस आवक घटली असून त्याचे परिमाण कापूस भाव वाढीवर दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी 3 महिने प्रतीक्षा करूनही कापूस भाव वाढले नाही मात्र लोकसभा निवडणुक तोंडावर येताच कापूस भाव वाढत आहे. परंतु या कापूस भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांनी कमी तर व्यापाऱ्यांना जास्त होण्याची शक्यता आहे.
कापूस आवक मोठ्या प्रमाणात घटल्यास व जागतिक बाजारात कापूस मागणी अधिक वाढल्यास मार्च महिन्यात शेवटी किंव्हा एप्रिल महिन्यात कापसाचे भाव जवळपास 5% वाढण्याची शक्यता कापूस व्यापारी व्यक्त करत आहे. म्हणजे मार्च महिन्यात शेटवती किंव्हा एप्रिल महिन्यात कापूस भाव 8500 ते 9000 रुपये होण्याची शक्यता दाट आहे.
टीप:- कापूस भाव किती वाढणार किती कमी होणार हा फक्त एक अंदाज असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा निर्णय स्वतः घ्यावा धन्यवाद…