Cotton Rate : 2024 यंदा कापसाला काय भाव मिळणार?
Kapus Bhav Future : कपाशीला मागील दोन वर्षांपासून कमी भाव मिळत आहे. यंदा 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल भावाने कापूस विक्री करावा लागला आहे. गेल्या खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारात झालेल्या घडामोडीमुळे कापूस भावावर प्रभाव दिसून आला. हमीभाव सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नसून मागील हंगामात शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही.
कापुस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे दोन पीक आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी या दोन पिकावर अवलंबून आहे. कापुस आणि सोयाबीन दोन्ही पिकास मागील हंगामात खूप कमी भाव मिळाला आहे. सोयाबीन पिकास हंगामाच्या शेवटपर्यंत हमीभाव सुद्धा मिळाला नाही. आज सोयाबीन भाव पाहिले तर वली सोयाबीन 3500 रुपये ते चांगली सोयाबीन 4500 रुपये विक्री होत आहे.
या वर्षी 2024 खरीप हंगामात सुरुवातीला सोयाबीन आणि कापूस पिकास दर्जेदार क्वालिटी होती. परंतु, सोयाबीन काढणीच्या काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वादळी पाऊस झाल्यामुळे काढणीस आलेलं सोयाबीन पाण्यात बुडाले व सोयाबीन शेंगा फुटल्या तसेच सोयाबीन दाण्याची क्वालिटी खराब झाली आणि पावसात भिजलेल्या सोयाबीन मध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे भाव खूप कमी मिळाला आहे.
मागील हंगामात कापूस पिकास कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड योग्य मानली परंतु यंदाही सोयाबीन पिकाचं अवकाळी पावसामुळे खूप मोठ नुकसान झालं आहे. तसेच सोयाबीन भाव हमी भावापेक्षा कमी मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना यंदाही खर्च निघालेला नाही.
यंदा सुरुवातीला कापूस पीक जर्जेदर होते. परंतु, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वादळी मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कापूस विकास बोंडांची संख्या अधिक प्रमाणात असून वादळी पावसामुळे कापूस पीक भुईसपाट झाले आहे. जमिनीवर पडलेल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळ व बोंडसड झाले आहे. यंदा कापूस पिकावर कीड आणि वादळी पाऊस असे दुहेरी संकट असल्यामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस उत्पादन घटणार असून यंदा कापसाला समाधानकारक भाव मिळू शकतो अशी शक्यता आहे.
कापुस भाव वाढण्याची शक्यता आहे का?
मित्रांनो काही गोष्टीचा अभ्यास केला तर मागील दोन वर्षापासून कापूस पिकास कमी दर मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कंटाळून कापूस पिकाची लागवड कमी केली आहे. कापूस लागवड कमी व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे झालेलं नुकसान. तसेच किडींचा आणि बोंड अळ्यांचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता कापूस पिकाचे उत्पादन घटणार आहे. यंदाच्या बदलत्या हवामानामुळे सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीन उत्पादन घटले असून एकरी 6 ते 7 क्विंटल सोयाबीन होत आहे. सोयाबीन उत्पादन कमी होत असून खर्च शेतकऱ्यांचा वसूल झालेला नाही. तसेच कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र मागील दोन हंगामापासून कापसाला मिळत असलेला कमी भाव पाहता यंदा समाधानकारक भाव मिळू शकतो अशी शक्यता आहे.
यंदा कापूस भाव कसे राहतील?
कापुस खर्च पाहता कापसाला 10 ते 12 हजार रुपये भाव असणे अपेक्षित आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून 6500 ते 7500 रुपये भाव मिळत आहे. अनेक वेळा हमीभाव देखील मिळालेला नाही. त्यामुळे कापूस पिकाकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कापुस लागवड क्षेत्र कमी झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस भाव दबावात राहिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहे. याहीवर्षी कापूस भाव कमी राहिले तर पुढील हंगामात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते त्यामुळे कापूस भाव यंदा ठीक ठाक राहण्याची शक्यता आहे. कापुस भाव यंदा खरचं वाढतील का? आणि किती वाढतील? लगेच सांगता येणार नाही परंतु कापूस लागवड कमी आणि उत्पादनात घट पाहता यंदा कापूस भाव वाढण्याची शक्यता आहे.