Crop Insurance Claim; शेतकरी नुकसान भरपाई ऑनलाईन फॉर्म मोबाईल मध्ये कसा भरावा?

Crop Insurance Claim; शेतकरी नुकसान भरपाई ऑनलाईन फॉर्म मोबाईल मध्ये कसा भरावा?

crop insurance claim online apply
Crop Insurance Claim; शेतकरी नुकसान भरपाई ऑनलाईन फॉर्म मोबाईल मध्ये कसा भरावा?

How to make a crop insurance claim in mobile app :- मोबाईल ॲप द्वारे पीक नुकसान भरपाई क्लेम कसा करावा, त्याबद्दल आपण सर्व अचूक माहिती घेऊ. तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर नक्की करा.

शेतकरी मित्रांनो अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान होते ते नुकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी ऑनलाईन अर्ज कसा करा? अर्ज करण्यासाठी काय करावे? याबद्दल पुरेपूर माहिती नसल्यामुळे यापासून अनेक शेतकरी वंचित राहतात व त्यांना त्यांचा पिकाची झालेली नुकसान भरपाई मिळत नाही. तर आपण आपल्या मोबाईल द्वारे नुकसान भरपाई ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकतो त्याबद्दल खाली सविस्तर माहिती पाहू..

स्टेप 1:- सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये Crop Insurance ॲप डाउनलोड करणे गरजेचे आहे, त्यासाठी Google Play Store वर जाऊन हे ॲप डाउनलोड करून घ्या.

स्टेप 2: त्यांनतर हे ॲप ओपन केल्यानंतर “Continue as Guest” या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 3: त्यांनतर पिकाचे नुकसान “Crop Loss” या ठिकाणी क्लिक करून समोर जा.

स्टेप 4: त्यांनतर पीक नुसनीच्या सूचना “Crop Loss Intimation” यावर क्लिक करून घ्या.

स्टेप 5: शेतकरी मित्रांनो त्यांनतर तुम्हाला OTP द्वारे तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल व त्या नंबर वर एक OTP येईल तो OTP टाकून Send OTP या ठिकाणी क्लिक करायचे आहे.

स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला Kharip, Rabbi, Summer कोणत्या सिजन मध्ये नुकसान झाले ते निवडायचे आहे. पावसाळ्यात झाले असेल तर Kharip निवडा व हिवाळ्यात झाले असेल तर Rabbi निवडा.

स्टेप 7: त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षी (Year) नुकसान झाले ते निवडायचे आहे.

स्टेप 8: त्यांनतर तुम्हाला Scheme निवडा म्हणून विचारले जाईल तुम्हाला Pradhan Mantri Fasal Bima Yojana हे निवडायचे आहे.

स्टेप 8: त्यांनतर तुम्हाला तुमचे राज्य (State) विचारले जाईल तुमचे राज्य निवडायचे आहे.

स्टेप 9: त्यांनतर खाली ग्रीन पट्टीत “Select” ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून समोर जायचे आहे.

स्टेप 10: त्यानंतर तुमचा फॉर्म बँकेत भरला का CSC केंद्रावर भरला का शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरला असे वेगवेगळे ऑप्शन दिले जाईल ज्या ठिकणाहून तुम्ही फॉर्म भरला ते निवडा.

स्टेप 11: त्यांनतर तुमचा एप्लिकेशन्स नंबर टाकून Done या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 12: त्यांनतर तुमची सर्व वयक्तिक माहिती तुम्हाला दिसेल तुमचे नाव, राज्य, बँक खाते व मोबाईल नंबर सर्व माहिती बरोबर आहे की नाही चेक करून घ्या.

स्टेप 13: त्यांनतर तुमच्या ज्या पिकाचे नुकसान झाले ते पीक पाहून त्यावर क्लिक करा व निवडा.

स्टेप 14: त्यांनतर तुमच्या पिकाचे नुकसान कोणत्या कारणामुळे झाले “Type of Incidence” ते निवडा. नुकसान होण्याचे अनेक वेगवेगळे कारण असतात ते तुम्हाला निवडायचे आहे.

स्टेप 15: त्यानंतर “Date of Incidence” तुमच्या पिकाचे नुकसान कोणत्या तारखेला झाले ती तारीख निवडा.

स्टेप 16: त्यांनतर तुम्हाला नुकसान झालेल्या पिकाची अवस्था कशी होती म्हणजे Standing Crop उभ्या पिकाचे नुकसान झाले का, Harvested म्हणजे काढणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले का किंव्हा Cut and Spread म्हणजे पीक कापून शेतात पसरलेले होत का असे तीन ऑप्शन येईल त्यापैकी एक निवडायचे आहे.

स्टेप 17: त्यांनतर तुमच्या पिकाचे नुकसान किती टक्के झाले (Expected loss in percentage) ते निवडा. किती टक्के नुकसान झाले त्यानुसार टक्केवारी टाका.

स्टेप 18: त्यांनतर तुम्हाला “Upload Documents” या ऑप्शन वर जाऊन ज्या पिकाचे नुकसान झाले त्या पिकाचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. तसेच त्यांनतर “Upload Video” या ओप्शनवर क्लिक करून नुकसान झालेल्या पिकाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे.

स्टेप 19: हे प्रोसेस पूर्ण झाल्यावर “Submit” या ऑप्शन वर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करा.

अधिक माहितीसाठी Youtube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *