Farmer Loan Waiver; राज्य सरकार शेतकऱ्यांचे तीन लाख रुपया कर्जमाफी करण्याचा विचार करतय.!
Maharashtra Farmer Loan Waiver:- खतांची, औषधांची वाढती महागाई तसेच गेल्या वर्षी एल निनोमुळे पडलेला दुष्काळ, कापूस व सोयाबीन पिकाला मिळत असलेला कमी भाव लक्षात घेता राज्यातील शेतकरी या वर्षी खूप अडचणीत सापडलेला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात यावे यासाठी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. पणन मंत्री अब्दुल सत्तार हे सत्ताधारी पक्षाचे नेते असून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यासाठी मागणी करत आहे. तसेच विरोधी पक्षाकडून देखील कर्जमाफी साठी मोठी मागणी होत असून राज्यात सरकार तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
•शेतकरी संघटना आक्रमक:-
गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाचा पडलेला खंड, पीक काढणीच्या वेळी अतिवृष्टी मुळे पिकाचे झालेले नुकसान, वाढलेली महागाई, शेतमालाला मिळालेले कमी भाव या सर्व बाबी लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यात यावे त्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेत आहे. तसेच राज्यात सरकत पीक कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर आली आहे.
• विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळू शकते कर्ज माफी:-
सरकारकडून तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्याचा हालचाली सुरू आहे, लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे पराभव स्वीकारावा लागला आहे. शेतीमालाला मिळत असलेले कमी भाव, वाढत असलेली आयात, निर्यात बंदी या गोष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांची सत्ताधारी पक्षावर नाराजी असावी याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु राज्य सरकारकडून कर्जमाफी बद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण विरोधी पक्षनेते तसेच शेतकरी संघटना शेतकऱ्याचा कर्जमाफी होण्यासाठी पुढाकार घेत आहे. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनीही कर्जमाफी बद्दल सकारात्मक बाब सरकारसमोर मांडली आहे.
तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्याचा राज्य सरकार काय निर्णय घेत आहे, त्याबद्दल स्पष्ट माहिती आजुन समोर आलेली नाही माहिती मिळतात तुम्हाला अपडेट दिली जाईल अधिक माहितीसाठी Youtube व्हिडिओ पहा..