Harbhara Variety : एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हरभरा वान..
Harbhara Lagwad Mahiti : पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार आहे. थंडी मनल की हरभरा लागवड करण्यासाठी योग्य वेळ मानला जातो. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रब्बी हंगाम थोड्या दिवसात सुरू होणार आहे. हरभरा बियाणे निवड करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. रब्बी हंगामात हरभरा लागवड करायची असेल तर कोणते बियाणे निवडले पाहिजे? बियाणे निवडत असताना बियाण्यांचे वैशिष्ट्य माहिती असावे. कोणते बियाणे किती उत्पादन देतात माहिती असावे. तरच आपण योग्य बियाण्याची निवड रब्बी हंगामात हरभरा लागवड करण्यासाठी करू शकतो.
फुले विक्रांत : फुले विक्रांत या बियाण्यांचे आकाराने मध्यम असून तांबूस पिवळ्या रंगाचे आहेत. मध्यम कालावधीचा वान असून काढणीस 105 ते 110 दिवस लागतात. मर रोगास प्रतिकारक्षम. हेक्टरी सरासरी उत्पादन 25 क्विंटल आहे.
PDKV कांचन : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांनी विदर्भासाठी प्रसारित केलेला वान आहे. पीडीकेव्ही कांचन या वाणाची कालावधी 100 ते 110 दिवसाची आहे. विदर्भात हेक्टरी चांगलं उतोडण मिळून देणारा वान आहे. मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची लागवड विदर्भातील शेतकऱ्यांनी करावी. एकरी उत्पादन सरासरी 12 क्विंटल इतके आहे.
जॉकी 9218 : जिरायत आणि बागायत लागवडीसाठी योग्य. बागायत उत्पादन अधिक असून हेक्टरी 28 क्विंटल इतके आहे. सरासरी उत्पादन 18 क्विंटल पर्यंत आहे. मर रोगास प्रतिकारक्षम आहे. एकरी बियाणे 30 किलो वापरावे. दाण्याचा आकार मोठा. महाराष्ट्रात या लागवड सर्वाधिक होते. कालावधी 105 ते 110 दिवस आहे.
कृपा काबुली : कृपा हा राज्यातील लोकप्रिय काबुली वान आहे. या वाणाची कालावधी 110 दिवस इतकी आहे. दाणे टपोरे आहे. पांढरे शुभ्र दाणे. बाजार भाव चांगला मिळतो. कृपा काबुली वान हेक्टरी सरासरी 16 ते 18 क्विंटल उत्पादन आहे. महाराष्ट्र बरोबरच मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यात लागवडीसाठी शिफारस केलेला वान आहे.
विजय : लवकर काढणीस येणार वान असून, कोरडवाहू साठी उत्तम वान आहे. 90 ते 100 दिवसात काढणीस येतो. बागायत लागवड असेल तर 110 दिवस लागू शकतात. कोरडवाहू हरभरा लागवड करायची असेल, तर विजय हा वान चांगला आहे. पाण्याचा ताण सहन करणारा वान आहे. उशिरा पेरणी करण्यासाठी योग्य. जिरायत, कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी योग्य वान आहे. मर रोगास प्रतिकारक्षम. हेक्टरी उत्पादन सरासरी 18 ते 20 क्विंटल आहे.
दिग्विजय : बागायती क्षेत्रात हेक्टरी भरघोस उत्पादन देणारा वान आहे. बागायत मध्ये 30 ते 35 क्विंटल उत्पादन आहे. जिरायत आणि बागायत मध्ये लागवड करता येत. जिरायत कालावधी 90 ते 95 दिवसाचा आहे. तर बागायत कालावधी 110 ते 115 दिवसाचा आहे. मर रोगास प्रतिकारक्षम. पिवळसर तांबूस रंगाचे दाणे आहे.