IMD Alert; आज पासून राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ये अती मुसळधार पावसाचा अंदाज.
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज दिनांक/ 12 जुलै पासून 15 जुलै पर्यंत हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच काही जिल्ह्यात मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.
आज शुक्रवार, शनिवारी, रविवार आणि सोमवार या चार दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आज पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात विशेष घाट भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात मध्येम ते हलका पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवार रोजी कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही भागात अती मुसळधार पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील मुसळधार तर ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Orange Alert (ऑरेंज अलर्ट):- राज्यात उदया दिनांक/ 13 जुलै शनिवार रोजी राज्यातील कोकण भागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई व पालघर तसेच 14 आणि 15 जुलै रोजी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दिनांक/ 13,14,15 जुलै दरम्यान मध्ये महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी म्हणजे 13,14 आणि 15 जुलै मध्येम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे तर काही ठराविक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काही भागात मध्येम व हलका पाऊस होणार आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज आहे धन्यवाद…