IMD Alert:- आज 8 जुलै कोकण, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट!
शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे, मित्रांनो आपण शेतीविषयक अचूक माहिती शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे आपल्या या व्हॉट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा. आज 8 जुलै राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच माराठवड्यात काही पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
• पाऊस कुठे पडला:-
मागील दोन दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे, तसेच कोकणातील काही जिल्ह्यात तर ढगफुटी दृश्य पाऊस पाहायला मिळाला आहे. त्याच बरोबर मागील दोन दिवसात मध्ये महाराष्ट्रातील घाट परिसरात अती मुसळधार पाऊस झालेला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्येम जोरदार पाऊस झाला आहे.
• दिनांक 8 जुलै रेड अलर्ट-
आज पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या चार जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजे आज दिनांक 8 जुलै रोजी कोकणातील काही भागात तर मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा आहे.
• दिनांक 6 व 7 जुलै पासूनच विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यात म्हणजे अकोला, बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, घाट भागात मुसळधार पाऊस होत असून मुंबई च्या अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे तर कोल्हापुरात नदीला पूर वाहू लागला आहे.
• ऑरेंज अलर्ट- (IMD Orange Alert Today).
आज कोकणातील अनेक भागात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा आहे. तसेच विदर्भातील विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज ऑरेंज व येलो अलर्ट जारी केला असून अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे.
• येलो अलर्ट- (Yellow Alert Today).
आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा आहे तर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जणे सह पावसाचा अंदाज आहे.
• वादळी वाऱ्यासह पाऊस – Gusty Wind and Heavy Rain in Marathavada.
आज दिनांक 8 जुलै रोजी माराठवडतील सर्व जिल्ह्यात तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, सोलापूर, संगीली जिल्ह्यातील काही भागात 40 ते 50 किलो मीटर प्रती घंटा वरे वाहणार असून काही भागात विजेच्या कडकडाट मध्येम ते जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
शेतकरी मित्रांनो आज 8 जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ या विभागातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मध्येम जोरदार पाऊस होणार आहे.