IMD Alert; आज 27 जुलै राज्यातील 15 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा!
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो आज दिनांक/ 27 जुलै शनिवार आजही राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज एकूण 15 जिल्ह्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला असून काही मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस अगदी अचूक माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू…
शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे तुम्हाला रोजच्या रोज हवामान अंदाज आणि शेती विषयक माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा..
मागील 48 तासात घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. घाट माथ्यावरील अनेक भागात 200 मिली मीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून पुणे, सातारा, नगर, कोल्हापूर आणि नाशिक भागातील धरणाचे पाणी झपाट्याने वाढले आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोका पातळी पार केली असून नदी काठच्या गावांना पाणी शिरले आहे.
• आज 27 जुलै पावसाचा अंदाज कसा?
आजही कोकणातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी असून जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मागील 48 तासात कोकणातील काही जिल्ह्यात घाट माथ्यावरील भागात अतिवृष्टी झाली असून कोकणातील नद्यांना पाणीच पाणी आले आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे.
तसेच जळगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा अंदाज असून या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने आज येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नंदुरबार, धुळे आणि नाशिक घाट माथ्यावरील परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे ते इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम सरी बरसणार आहे.
आज विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी असून गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यात अती जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. आज दिनांक/ 27 जुलै शनिवार रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र घाट माथा आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम पावसाचा अंदाज आहे.
• थोडक्यात माहिती :-
• येलो अलर्ट इथे :- मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या आठ जिल्ह्यात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे.
• ऑरेंज अलर्ट इथे :- आज पुणे घाट माथा, सातारा घाट माथा, कोल्हापूर घाट माथा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार ते अती जोरदार पावसाचा अंदाज आहे.
• ग्रीन अलर्ट इथे :- नंदुरबार, धुके, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
• विजेच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट :- आज विदर्भातील अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी असून काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे धन्यवाद…