IMD Alert; आज कोकण आणि घाट माथा भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट..
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो मागील 48 तासात राज्यात पावसाचा जोर कमी झालेला असून आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात घाट माथ्यावरील भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मागील 24 तासात घाट माथ्यावरील काही भागात 100 मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची उघडिस मिळाली आहे.
• आज दिनांक/ 30 जुलै मंगळवार आजचा हवामान अंदाज:-
आज राज्यातील फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे, त्यामध्ये कोकणात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात येलो अलर्ट जारी असून घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात घाट माथ्यावरील परिसरात अती मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी आहे.
तसेच नाशिक, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट जारी केला असून वरील सहा जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.
मराठवाडा जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण राहणार तुरळक पावसाचा अंदाज आहे. आज दिनांक/ 30 जुलै मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात फवारणी योग्य वातावरण तयार झाले आहे तरी शेतातील काम शेतकऱ्यांनी उरकून घ्यावे.
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी पावसाची उघड मिळताच सोयाबीन व कापुस फवारणी व खत व्यवस्थापन करून घ्यावे.
तसेच खानदेशात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आहे, आज दिनांक/ 30 जुलै रोजी नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट जारी केला आहे. सर्वदूर ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघड असेल त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे कामे उरकून घ्यावी धन्यवाद…