IMD Red Alert; उदया 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट अती मुसळधार पावसाचा इशारा.!
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे.
शेतकरी मित्रांनो आपण 14 जुलै रविवार रोजिचा हवामान अंदाज पाहणार आहोत. दिनांक/ 14 ते 16 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागात मुसळधार, अती मुसळधार, मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
शेतकरी मित्रांनो उदया दिनांक/ 14 जुलै रविवार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील चात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तसेच ठाणे, रायगड आणि पुणे या तीन जिल्ह्यांना रविवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच खानदेशातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज कमी असून काही ठिकाणी हलका पाऊस होणार आहे तर जळगाव जिल्ह्यात वीजेंचा कडकडाट हलक्या पावसाचा अंदाज आहे.
उदया दिनांक/ 14 जुलै रविवार रोजी नाशिक जिल्ह्यात मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज आहे तर काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून मेघगर्जनेसह जोरदार तसेच मध्येम व हलक्या पावसाचा अंदाज आहे.