IMD Weather Forecast; पुढील काही तासातच या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस! डॉ कृष्णानंद होसाळीकर..
व्हायरल फार्मिंग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, पुढील काही तासातच राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अती जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याचे प्रमुख डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
• 28 जुलै हवामान अंदाज :-
उदया दिनांक/ 28 जुलै रविवार रोजी विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून याचा प्रभाव राज्यातील काही जिल्ह्यावर दिसून येणार आहे. उदया विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट असून काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासात विदर्भात पावसाची पोषक वातावरण तयार झाले असून भंडारा , गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात अती जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याचे प्रमुख डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पुढील 24 तासात मध्यम पावसाचा अंदाज असून घाट माथ्यावरील परिसरात जोरदार पाऊस होऊ शकतो. उदया दिनांक/ 28 जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील इतर भागात ढगांची दाट गर्दी होऊन रिमझिम पाऊस सुरू राहील.
उदया रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला असून या जिल्ह्यात घाट माथा भागात अती जोरदार पावसाचा अंदाज आहे. नदी नाल्यांना पूर येईल असा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
उदया पुणे घाट माथ्यावरील भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
• दिनांक/ 28 जुलै 2024 हवामान अंदाज:-
• मध्यम पावसाचा अंदाज :- उदया राज्यातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून हवामान खात्याने मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
• मुसळधार पावसाचा येलो अलर्ट :- उदया विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
• तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी आहे.
• रायगड आणि सातारा घाट माथ्यावरील भागात अती मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
नवीन माहिती अपडेट झाल्यास तुम्हाला लगेच कळवली जाईल तरी तुम्ही आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा…