Jalna market today:- कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी सोयाबीन, पांढरी तूर, लाल तूर, रेशीम कोष, शाळू ज्वारी व काबुली हरभरा भाव कसे आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहू..
सोयाबीन बाजार भाव जालना:-
जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीन भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन साठून ठेवली परंतु सोयाबीन भाव पातळी अनेक दिवसा पासून कमी होत आहे. सोयाबीन भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून जालना बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीन ला 3 हजार 800 रुपये प्रति क्विंटल ते 4450 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. हा भाव पाहता जालना जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च ही वसूल होईना.
पांढरी तूर बाजार भाव जालना:-
कृषी उत्पन्न बाजार समिती जालना इथे पांढऱ्या रंगाच्या तुरीपेक्षा लाल तुरीला चांगला भाव पाहायला मिळत आहे. आज दिनांक 15 मार्च रोजी जालना बाजार समिती मध्ये पांढरी तूर 5000 रुपये प्रति क्विंटल पासून 9877 रुपये प्रति क्विंटल या भावाने विक्री झाली आहे. यंदा तुरीचे उत्पादन घटले असून तुरीला चांगला भाव पाहायला मिळत आहे.
लाल तूर बाजार भाव जालना:-
शेतकरी मित्रांनो यंदा जालना जिल्ह्यात तुरीची पेरणी कमी झाली असून नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तुरीचे उत्पादन घटले आहे त्यामुळे तुरीला सध्या चांगली मागणी वाढली आहे. जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीला चांगला भावात मिळत असून कमीत कमी 7200 रुपये प्रति क्विंटल दराने लाल तूर विक्री होत आहे तर एक नंबर क्वालिटी तुरीला 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव आज 15 मार्च रोजी मिळाला आहे.
रेशीम कोष जालना बाजार भाव:-
मराठवाड्यात जालना ही कृषी उत्पन्न बाजार समिती रेशीम कोष खरेदी करण्यासाठी चांगली बाजार समिती आहे. यंदा दुष्काळ पडल्यामुळे पाण्याचा अभावी रेशिक शेती संकटात आलेली आहे त्यामुळे अनेक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी पाणी नसल्यामुळे कोष उत्पादन घेणे मार्च महिन्यात बंद केले आहे. त्यामुळे जालना बाजार समिती मध्ये रेषिक कोष आवक कमी होत असून त्याला चांगला भाव मिळत आहे. आज दिनांक 15 मार्च रोजी पांढरा रेशीम आवक फक्त 25 क्विंटल झाली असून त्यास 42000 ते 44000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे म्हणजे 420 ते 440 रुपये प्रति किलो या दराने जालना बाजार समिती मध्ये पांढरा रेशीम कोष विक्री होत आहे.
शाळू ज्वारी बाजार भाव जालना:-
जालना बाजार समिती मध्ये शाळू ज्वारी बाजार भाव चांगला आहे. एक नंबर क्वालिटी शाळू ज्वारी ला सर्वाधिक 4100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यंदा जालना जिल्ह्यात ज्वारी लागवड वाढली असून सध्या ज्वारी बाजार भाव थोडे दबावात आले आहे. जालना बाजार समिती मध्ये शाळू ज्वारी 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 4100 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे.
गहू बाजार भाव जालना:-
कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी गव्हाला कमीत कमी 2 हजार 199 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 3000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
जालना काबुली हरभरा बाजार भाव:-
जालना बाजार समिती मध्ये काबुली हरभरा आवक 17 क्विंटल एकूण झाली असून या बाजार समिती मध्ये काबुली हरभरा 6500 रुपये प्रति क्विंटल पासून 7200 रुपये प्रति क्विंटल या भावाने विक्री होत आहे धन्यवाद…