Kapus Dusri Favarni; कापूस दुसरी फवारणी कोणती आणि कधी करावी संपूर्ण माहिती.
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकासाठी दुसरी फवारणी कधी करावी? कापूस दुसरी फवारणी कोणती करावी? पाते संख्या वाढवण्यासाठी फवारणी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो मी MSc अग्री केली असून शेतकऱ्यांना संपूर्ण अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी माहिती शेवटपर्यंत वाचा आवडल्यास शेअर नक्की करा.
•कापूस दुसरी फवारणी कधी करावी:-
शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुटवा जास्त प्रमाणात राहण्यासाठी तसेच पाते संख्या वाढवण्यासाठी व कापूस पिकातील मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फुल किडे नियंत्रण करण्यासाठी दुसरी फवारणी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो कापूस पिकात दुसरी फवारणी पहिली फवारणी केल्यापासून 20 ते 25 दिवसाच्या अंतराने करावी म्हणजे पहिली फवारणी कापूस लागवडीपासून 25 दिवसाला केली असेल तर दुसरी फवारणी 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान करावी. आता आपण पाहिले आहे कापूस दुसरी फवारणी कधी करावी त्याबद्दल संपूर्ण माहिती.
• कापूस दुसरी फवारणी का करावी:-
शेतकरी मित्रांनो कापूस पिकात 45 ते 55 दिवसाच्या कालावधीत मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच फुल किडींचा प्रादुर्भाव होतो, तसेच पाते संख्या कमी लागणे ही समस्या दिसून येते, त्यामुळे कीड नियंत्रण आणि पाते संख्या वाढवण्यासाठी व फुटवा जास्त लागण्यासाठी दुसरी फवारणी करावी लागते.
• कापूस दुसरी फवारणी कोणती करावी:-
शेतकरी मित्रांनो कापूस पिकात फुटवा व पाते वाढवण्यासाठी टॉनिक तसेच विद्राव्य खत महत्वाचे आहे त्याचबरोबर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल कीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी खूप महत्वाची आहे.
1- मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुल किडे नियंत्रण करण्यासाठी फ्लोनिकॅमिड 50% WG घटक असलेले कीटकनाशक UPL Ulala किंव्हा Swal Panama 8 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
+
2- फुटवे व पाते वाढवण्यासाठी टॉनिक Fantac plus 10 मिली प्रती पंप घ्यावे किंव्हा जोमदार वाढीसाठी व पाते संख्या वाढवण्यासाठी Tata Bahaar 40 मिली प्रती पंप घ्यावे.
+
3- कापूस फुटवे वाढवण्यासाठी विद्राव्य खत 12-61-00 हे 80 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
+
4- ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होतो तो नियंत्रणात ठेवण्यासाठी बुरशीनाशक Saaf 30 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Roko 30 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
• कापूस दुसरी फवारणी थोडक्यात माहिती:-
• UPL Ulala 8 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Swal Panama 8 ग्रॅम प्रति पंप. (टिप्स – फ्लोनिकॅमड 50% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीच कीटकनाशक घेऊ शकता).
• टॉनिक Tata Bahaar 40 मिली प्रती पंप किंव्हा Fantac Plus 10 मिली प्रती पंप घ्यावे.
• विद्राव्य खत 12-61-00 हे 80 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.
• बुरशी येऊ नये त्यासाठी Saaf बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Roko बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति पंप घ्यावे धन्यवाद..