Kharip 2024 Pik Vima; पीक विमा लवकर भरा अवघे काही तासच बाकी.

Kharip 2024 Pik Vima; पीक विमा लवकर भरा अवघे काही तासच बाकी.

Kharip 2024 Pik Vima; पीक विमा लवकर भरा अवघे काही तासच बाकी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो आपण नेहमीच राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल या दृष्टिकोनाने शेतीविषयक माहिती देत असतो, तरी जास्तीत जास्त माहिती शेअर करा व आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नक्की व्हा.

•पिक विमा अंतिम तारीख:-

शेतकरी बंधूंनो पीक विमा भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे घेऊन आपल्या जवळील CSC Centre (सीएससी) केंद्र आहे त्या केंद्रावर जाऊन तुम्हाला पिक विमा नोंदणी करायची आहे कारण 15 जुलै ही अंतिम तारीख असून शेतकऱ्यांनी या अगोदर पिक विमा भरणे गरजेचे आहे. विमा भरण्याची तारीख वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी बसू नये असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे म्हणजे 15 जुलै च्या आत पिक विमा भरणे अत्यावश्यक आहे.

•पिक विमा का गरजेचा:-

मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवांनी पीक विमा भरणे गरजेचे आहे, कारण अतिरेक होणाऱ्या पावसामुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचे होणारे नुकसान व होणाऱ्या नुकसानीचे भरपाई करण्यासाठी आपल्याला शासनामार्फत पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते, त्यामुळे पिक विमा प्रत्येक शेतकरी बांधवांनी भरलाच पाहिजे. तसेच केंद्र सरकारने एक रुपया पिक विमा सुरू केल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांचा कल पिक विमा भरण्याकडे वाढलेला आहे असून यंदाच्या आकडेवारीनुसार एक कोटी तीन लाख पेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी सहभाग नोंदवलेला असल्याची प्राथमिक माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

• पीक विमा भरून घ्या अवघे काही तास बाकी:-

राज्यातील शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला नसेल तर लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावे असा सल्ला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. फक्त एक रुपया पिक विमा योजना सुरू केल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांचा कल आता पिक विमा भरण्याकडे वाढला आहे, परंतु लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली आहे यासाठी कागदपत्रे गोळा करीत असलेले शेतकरी पिक विमा भरण्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ तर घ्यावाच, परंतु पिक विमा भरायचा राहिला असेल तर पिक विमा सुद्धा 15 जुलै च्या अगोदर लवकरात लवकर भरून घ्यावा. कारण शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारी नुकसान व त्या नुकसानीचे आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाणारी मदत प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळावी त्यासाठी एक रुपयाचा पिक विमा भरणे गरजेचे आहे.

सूचना:-

Central Government:- पिक विमा ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या राज्यात राबवण्यात येत असून केंद्र सरकारकडून ही राबविण्यात येणारी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना होणारे पिकाचे नुकसान भरपाई देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कल देखील आता पिक विमा भरण्याकडे अधिक वाढत आहे, परंतु खरीप 2024 या हंगामातील पिक विमा भरण्याचा राहिला असेल तर शेतकऱ्यांनी 15 जुलै च्या अगोदर पिक विमा भरावा कारण 15 जुलै पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ठरलेली आहे धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *