Kusum solar pump yojana:- शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. शेतकऱ्यांना मॅसेज आल्यानंतर पहिला प्रश्न पडतो की सोलार पंप साठी पेमेंट कसे करावे. पेमेंट किती करावे. कुसुम सोलार पंपच्या योजने अंतर्गत पेमेंट कसे करावे त्या बद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहू.. Solar Payment Kase Karave Mahiti..
Kusum Solar Pump Payment Process; कुसुम सोलार पंप पेमेंट कसे करावे संपूर्ण माहिती:-
सोलार पंप बसवण्यासाठी अनेक फसाऊ मॅसेज सध्या शेतकऱ्यांना येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेमेंट करण्याअगोदर आपण चुकीच्या ठिकाणी तर पेमेंट करत नाहीना याची खात्री करूनच पेमेंट करावे.
Mahaurja MEDA ॲप्लिकेशन द्वारे login करून करून सेल्फ सुर्वे आणि पेमेंट तुम्ही करू शकता. फेक मॅसेज पासून सतर्क रहा कुठ्ल्याही लिंक वर क्लिक करून शक्यतो पेमेंट करू नका तुमची फसवणूक होऊ शकते.
पेमेंट करण्याअगोदर सोलार पंप साठी जे लाभार्थी आहे त्यांना सर्वप्रथम सेल्फ सुर्वे करणे गरजेचे शक्यतो लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सेल्फ सुर्वे करू नका, सेल्फ सुर्वे करण्यासाठी स्वतःच्या विहिरीचा फोटो काढा.लाभार्थ्यांना फोटो देणे गरजेचे आहे, विहिरीचा फोटो देणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी स्वतःच्या शेतातील विहिरींचे फोटो देणे गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो सेल्फ सुर्वे करण्यासाठी कुढलिही चूक करू नका नाहीतर सोलार पंप चे व्हेरिफिकेशन करतांना तुम्हाला समस्या येऊ शकतात. त्यामुळे सेल्फ सुर्वे अचूक आणि सर्व नियमांचे पालन करूनच करावे.
कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत पेमेंट कसे आणि किती करावे:-
1- MEDA mahaurja beneficiary ॲप्लिकेशन सर्व प्रथम तुम्हाला Google Play Store वरून डाउनलोड करायचे आहे.
2- MEDA mahaurja beneficiary ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्व प्रथम लाभार्थ्यांचा Mobile Number टाकायचा आहे.
3- मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला MEDA mahaurja beneficiary ॲप्लिकेशन मध्ये एक Permissions (सहमती) मागितली जाईल ती तुम्हाला द्याची आहे.
4- त्यांनतर लाभार्थ्यांनी जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो तुम्हाला एंटर करायचा आहे.
5- OTP टाकल्या नंतर MEDA mahaurja beneficiary ॲप्लिकेशन चे Dashboard दिसेल. त्यानंतर Application details (अर्जाची माहिती) या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जाची माहिती पहायची आहे.
6- शेतकरी मित्रांनो तुम्ही जर MEDA mahaurja beneficiary ॲप्लिकेशन द्वारे सेल्फ सुर्वे केलेला असेल तर तुम्हा पेमेंट करा (Make Payment) चे ऑप्शन दिसून येईल अनेथा हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. Make Payment ऑप्शन दिसून येत नसेल तर सर्व प्रथम तुम्हाला सेल्फ सुर्वे करणे गरजेचे आहे.
7- तुम्हाला Make Payment (पेमेंट करा) ऑप्शन दिसून येत असेल तर सर्व प्रथम त्या ऑप्शन वार क्लिक करा. त्या नंतर लाभार्थ्यांना एक OTP येईल तो OTP टाकून तुम्हाला तुमचे अकाऊंट Verify करायचे आहे.
8- Varify झाल्या नंतर तुम्हाला किती पेमेंट करायचे आहे ते आपोआप दाखवण्यात येईल. त्यांनतर तुम्हाला बिलिंग ऍड्रेस भरायचा आहे म्हणजे नाव,गाव,मोबाईल नंबर, पिन कोड जी काही माहिती तुम्हाला विचारेल ती माहिती तुम्हाला भरायची आहे.
9- ही माहिती दिल्यानंतर तुम्ही पेमेंट google pay, phone pay, UPI, Credit card, Debit card, Bhim द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता धन्यवाद…
अधिक माहिती साठी व्हिडिओ पाहा..