Ladka Bhau Yojana राज्यातील तरुणांना प्रत्येक महिन्याला 10000 रुपये मिळणार GR आला..

Ladka Bhau Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाल्यानंतर आता लाडका भाऊ योजनेसाठी नवीन GR आला आहे. काय आहेत अटी? कोण होणार पात्र? पात्र उमेदवारांना महिन्याला किती रुपये? ही योजना का महत्वाची? संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांनाही माहिती शेअर करा.

Ladka Bhau Yojana राज्यातील तरुणांना प्रत्येक महिन्याला 10000 रुपये मिळणार GR आला..

• शैक्षणिक अर्हता प्रमाणे राज्य सरकारकडून विद्यावेतन दिले जाणार:-

12 वी पासून पदव्यूत्तर शैक्षणिक अर्हता केलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सर्वप्रथम अर्ज करून प्रशिक्षणासाठी तरुणाला सहा महिने कालावधी असणार आहे शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतनाचे वितरण करण्यात येणार आहे.

1- 12 वी पास शैक्षणिक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये मिळणार आहे.

2- आय. टी.आय/पदविका विद्यार्थ्यांना 8,000 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे.

3- पदवीधर/पदव्यूत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्यांना प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहे.

• लाडका भाऊ योजना का?

12 वी किंव्हा पदव्यूत्तर शिक्षण घेऊन देखील सध्या राज्यातील अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहे, नौकरी मिळत नसून अनेक विद्यार्थी बेरोजगार आहे, त्यामुळे राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या सोधत असतात. परंतु अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सामना करावा लागतो त्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही दिवसा पूर्वीच राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी खूप चांगला योजना लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. हा राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक हितासाठी घेतलेला निर्णय असून खरंच कौतुक करण्यासारखा आहे. त्यातच बेरोजगार लाडक्या भावासाठी देखील नवीन योजना सुरू करण्यात आली असून आता तरुणींना देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या घोषणेप्रमाणे तरुणांसाठी कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रतिमा आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

•योजनेचा लाभ:-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवणे या योजनेचा हेतू आहे. लाडका भाऊ योजने अंतर्गत राज्यातील शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना तसेच रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

• कधी सुरू होणार:-

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024/25 आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात यावी यासाठी आता मान्यता देण्यात आली आहे.

• आटी/शर्यती:-

•या योजेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 12 वी शिक्षण असावे तसेच ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• लाडका भाऊ योजना ही राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
• वय वर्ष 18 ते 35 वयोगटातील युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• लाडका भाऊ योजनेसाठी आधार लिंक बँक खाते असावे.
• अर्जदाराने रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *