Ladka Bhau Yojana लाडका भाऊ योजना कसा करावा अर्ज!
शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो आपण शेतीविषयक माहिती, नवनवीन माहिती सर्वात लवकर देण्याचा प्रयत्न करतो तरी माहिती शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा..
• योजनेची माहिती:-
लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू केल्यानंतर आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. लाडका भाऊ योजनेसाठी कसा कराल अर्ज? कोन्हाला किती मिळणार लाभ? कोणते कागदपत्रे लागणार? पाहू संपूर्ण माहिती..
• योजनेचा लाभ:-
वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळणार आहे. कमीत कमी शिक्षण 12 वी असावे लागणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
1- 12 वी झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रती माह 6000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
2- डिप्लोमा झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रती माह 8000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
3- डिग्री झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रती माह 10000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
• कसा करावा अर्ज?
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करावा त्याबद्द्ल संपूर्ण माहिती घेऊ.
1- राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर भेट दया.
2- त्यांनतर सर्व प्रथम नोंदणी पर्यावर क्लिक करून नोंदणी करून घ्या.
3- त्यासाठी तुम्हाला फॉर्म मध्ये नाव, पत्ता, वयोगट भरायचा आहे.
4- पात्र विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे उपलोड करा.
5- हे सगळ केल्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट करा.
• लागणारी कागदपत्र:-
लाडका भाऊ योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रे लागणार आहेत.
1- शैक्षणिक प्रमाणपत्र (मार्कशीट्स).
2- निवास प्रमाणपत्र.
3- मोबाईल नंबर.
4- ई- मेल आयडी.
5- पासपोर्ट फोटो.
फॉर्म भरण्यासाठी आजुन नवीन काही माहिती समोर आल्यास तुम्हाला कळवले जाईल धन्यवाद.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पहा..