Mukhaymantri Mazi Ladki Bahin Yojana First Installation:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रुपये कधी मिळणार?
नमस्कार मित्रांनो वायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे, मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति माह 1500 रुपये देण्यात येणार असून या योजनेचा पहिला हप्ता कधी पडणार? व किती पडणार? त्याबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर अनेक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी देण्यात आले होत्या परंतु या अटीमुळे राज्यातील अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात त्यांना लाभ घेता येणार नाही त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून मोठा आवाज उठवण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही अटी शर्यती रद्द केलेल्या आहेत.
1- आता पाच एकर ची अट देखील रद्द केलेली आहे.
2- तसेच वय वर्षा वाढून 21 ते 65 वय वर्ष असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
3- दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे.
4- वय वर्ष 21 असेल तर अविवाहित महिलेला सुद्धा लाभ घेता येणार आहे.
5- पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला लागणार नाही.
• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार?
या योजनेचे शासन निर्णयानुसार, जुलै महिन्यात ज्या महिला या योजनेसाठी पात्र झाल्यात त्यांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिनांक / 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आता 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना आर्ज सादर करता येणार आहे परंतु ज्या महिलांनी 01 ऑगस्ट नंतर अर्ज सादर केला त्यांना एकदाच दोन हप्त्याचे 3000 रुपये वितरित करण्यात येणार आहे.
• अर्जाची शेवट तारिक किती?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आता तारीख वाढवली असून 15 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे, परंतु 01 ऑगस्ट च्या अगोदर ज्या महिलांनी अर्ज सादर केला त्यांना 14 ऑगस्ट 2024 दरम्यान पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
• एकदाच 3000 रुपये मिळणार का?
शासन निर्णयानुसार ज्या महिलांनी 01 ऑगस्ट नंतर या योजनेसाठी अर्ज सादर केला आहे अशा महिलांना दोन हप्ते सोबतच म्हणजे 3000 रुपये सोबतच वितरित करण्यात येतील.
• विरोधी पक्षांचा टोला:-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली परंतु अनेक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी देण्यात आल्या होत्या या अटींची पूर्तता होत नसल्यामुळे अनेक महिला या योजनेपासून अपात्र राहू शकतात त्या कारणामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून आवाज उठवण्यात आला आणि काही अटी शर्यती रद्द करण्यात आलेले आहेत.
• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का सुरू करण्यात आली?
राज्यातील विवाहित, अविवाहित विधवा महिलांना आर्थिक साह्य मिळावे त्यासाठी राज्य शासनाने महिलांसाठी एक योजना आखली आहे त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना प्रति माह 1500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे धन्यवाद.