Maha DBT; बॅटरी चलित फवारणी यंत्र अर्ज करण्यासाठी मुदत वाढ! अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख पाहा..

Maha DBT; बॅटरी चलित फवारणी यंत्र अर्ज करण्यासाठी मुदत वाढ! अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख पाहा.. (Battery Operated Sprayer Pump Online Apply Date Increased)..

बॅटरी चलीत फवारणी पंप अर्ज मुदत वाढ
Maha DBT; बॅटरी चलित फवारणी यंत्र अर्ज करण्यासाठी मुदत वाढ! अर्ज करण्याची नवीन शेवटची तारीख पाहा..

व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो बॅटरी चलित फवारणी (Battery Operated Sprayer Pump Yojana Online Application New Date) यंत्रासाठी दिनांक/ 06 ऑगस्ट 2024 वार, मंगळवार ही शेवटची तारीख होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे (Technical Issues) अनेक शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता आलेला नाही, त्यामुळे बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

• फवारणी यंत्र :- Sprayer Pump –

कापूस व गळीत धान्य पिकाच्या कीड व्यवस्थापनासाठी अर्ज केलेल्या निवडक (लॉटरी) पद्धतीने 100 टक्के अनुदानावर पात्र शेतकऱ्यांना बॅटरी चलित फवारणी पंप मिळणार आहे.

• अगोदरची अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

शेतकरी मित्रांनो Maha DBT द्वारे राज्यातील कापूस व गळीत धान्य उत्पादक शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर बॅटरी चलित फवारणी पंप अर्ज करण्यासाठी आज दिनांक/ 06 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख दिली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे (Technical Issues) बॅटरी चलित फवारणी पंप अर्ज करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली असून आता दिनांक/ 14 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख (Last Date For Apply Online Application) असणार आहे. शेतकरी मित्रांनो आज पासून आठ दिवसाची मुदतवाढ करण्यात आली असून पुढील आठ दिवसात तुम्ही बॅटरी चलित फवारणी पंपासाठी महा डीबीटी पोर्टल (Maha DBT Portal) वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

• अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख मुदतवाढ :-

बॅटरी चलीत फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मुदत वाढ करण्यात आली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पोर्टलवर आलेली तांत्रिक अडचण त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर अर्ज करणे शक्य झाले नाही. तरी तुम्ही दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत महा डीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकता.

• अनुदान किती?

शेतकरी मित्रांनो 100 टक्के अनुदानावर महा डीबीटी द्वारे कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यातलीच बॅटरी चलित फवारणी पंप ही योजना असून यावर 100 टक्के अनुदानावर तुम्हाला लॉटरी पद्धतीने लाभ मिळणार आहे.

• अर्ज कसा करावा?

Maha DBT Portal महा डीबीटी पोर्टलवर जाऊन लॉगिन करून घ्यावे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *