Monsoon Rain; आज 25 जुलै 17 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा! IMD Alert Today..
व्हायरल फार्मिंग : किनार पट्टीतील समांतर असलेला कमी दाबाचा (Low Pressure) पट्टा राज्याच्या उत्तरेकडून पूर्व पश्चिम वाऱ्यामुळे राज्यातील घाट माथ्यावरील भागात आज दिनांक/ 25 जुलै रोजी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर एक दोन ठिकाणी 200 मिली मीटर पेक्षाही अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
• ऑरेंज अलर्ट: (Orange Alert Today)..
किनार पट्टीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोल्हापूर, सातारा, पुणे आणि ठाणे घाट माथ्यावरील भागात आज सकाळपासूनच जोरदार ते अती जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. घाट माथ्यावरील एक दोन भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट माथ्यावरील परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होणार आहे.
• कोल्हापूर जिल्हा:-
•कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे राजाराम बंदराची पाणी पातळी 42 फूट 5″ पर्यंत वाढली असून धोका पातळी जवळच आहे. तसेच राधानगरी धरण 99 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास धोका पातळी निर्माण होऊ शकते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहणे.
• घाट माथ्यावरील भाग:-
आज दिनांक/ 25 जुलै आजही राज्यातील घाट परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाट माथ्यावरील भागात आजही अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
• जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्हा:-
आज सकाळपासूनच वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी असून मुसळधार तर काही भागात मध्यम सतत धार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिनांक/ 25 जुलै मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
• खानदेशात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी मध्यम व हलका पाऊस पाहायला मिळणार आहे. आज मराठवाड्यात सकाळपासूनच ढग दाटून येणार असून सतत धर परभणी, हिंगोली, नांदेड आणि जालना या चार जिल्ह्यात सुरू राहणार आहे.
• विदर्भात येलो अलर्ट:-
आज दिनांक/ 25 जुलै रोजी विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि गडचीरली या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यात हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज आहे.
• फवारणी करावी:-
राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असून सतत धार सुरू आहे त्यामुळे शक्यतो कापूस आणि सोयाबीन पिकावरील फवारणी काही दिवस टाळावी असा कृषी तज्ञांनी सल्ला दिला आहे धन्यवाद…