मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे घेतल्यास मोठी कारवाई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस..
1 जुलैपासून फॉर्म सुरू झालेले आहेत 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्ट्रिक्ट वार्निंग दिली असून ही योजना महिलांच्या हितासाठी महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी सुरू करण्यात आली असून या योजनेमध्ये कोणी पैसे मागत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सेतू केंद्र किंवा अंगणवाडीतील सेविकांना प्रति फॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या व्यतिरिक्त तुम्हाला पैशाची मागणी केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही सेतू केंद्र किंवा अंगणवाडीतील सेविकांना राज्य सरकारकडून प्रति फॉर्म 50 रुपये देण्यात येणार आहे, या व्यतिरिक्त मागितल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल.
• घरबसल्या असा करा लाडकी बहीण योजनेचा अर्ज:-
मित्रांनो राज्यातील महिलांची गैरसोय होऊ नये त्यासाठी मोबाईल मध्ये देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जाऊन नारीशक्ती दूत (Narishakti Doot Mobile App) हे ॲप डाऊनलोड करायचे आहे आणि त्या ॲपवर Login करून तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. Login करण्यासाठीं सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP इंटर करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा Profile तयार करायचा आहे.
• Profile तयार करण्यासाठी:-
1- सर्व प्रथम तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे.
2- तुम्हाला तुमचा Email id विचारला जाईल.
3- तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा टाकायचा आहे.
4- त्यांनतर नारी शक्तीचा प्रकार तुम्हाला इंटर करायचा आहे व तुमचा Profile update करून घ्यायचा आहे.
• त्यांनतर तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हे ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून तुमचा फॉर्म ओपन होणार आहे. फॉर्म कसा भरावा सविस्तर माहिती खालील Youtube Video मध्ये पाहा धन्यवाद.