Nuksan bharpai- नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे. राज्यातील एकूण 04 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकसान भरपाई 2023-2024 अनुदान एकूण 04 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
दिनांक 04 मार्च 2023 रोजी नवीन GR आला आहे. नुकसान भरपाई 2023-2024 देण्यासाठी हा GR असून लवकरच नाशिक, भंडारा, गोंदिया व नागपूर या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बँक खात्यात नुकसान भरपाई 2023-24 अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नाशिक, भंडारा, गोंदिया व नागपूर या एकूण चार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत देण्यासाठी एकूण किती निधी मंजूर करण्यात आला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती खाली वाचा.
शेतकरी मित्रांनो वरील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अनुदान मंजूर झाले असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत अचानक अवकाळी पावसामुळे, गारपीट मुळे, चक्रीवादळ अश्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला मदत देण्यासाठी राज्य सरकारने निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे.
रब्बी हंगामात म्हणजे डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर एकूण राज्यातील नाशिक, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात पुढील हंगामात आर्थिक मदत व्हावी त्यासाठी अनुदान वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार:-
नाशिक, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत गारपीट, अवकाळी पावसामुळे झाले असेल त्या शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीसाठी शासन एकूण निधी 2467.37 रुपये म्हणजे (चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार रुपये) अनुदान स्वरूपात मदन करणार आहे.
एकूण नुकसानग्रस्त जिल्हे व एकूण निधी:-
1- नाशिक जिल्ह्यातील एकूण बाधित हेक्टरी शेत्र 13.60 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या फक्त 52 आहे, एकूण निधी 4.70 लक्ष रुपये.
2- भंडारा जिल्हा एकूण बाधित हेक्टरी शेत्र 2183.89 बाधित शेतकऱ्यांची संख्या 5388 आहे, एकूण निधी 589.65 लक्ष रुपये.
3- नागपूर जिल्हा एकूण बाधित हेक्टरी शेत्र 2656.34, बाधित शेतकऱ्यांची संख्या 4432, एकूण निधी मंजूर 664.18 लक्ष रुपये.
4- गोंदिया जिल्हा एकूण निधी मंजूर 1208.84 लक्ष रुपये.
नाशिक, भंडारा, गोंदिया व नागपूर या चार जिल्ह्यात एकूण बाधित हेक्टरी शेत्र आहे 4853.83 इतके, एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 9872.00, एकूण निधी मंजूर केला आहे 2467.37 लक्ष रुपये धन्यवाद…