Panjab Dakh दिनांक/ 26 जुलै पर्यंत राज्यात पाऊस बरसणार पाहा नवीन अंदाज.
•राज्यात जोरदार पाऊस:-
राज्यात दिनांक/ 10 जुलै ते 26 जुलै दरम्यान राज्यात दोन दोन दिवसाचा मुक्काम घेऊन दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. आता 26 जुलै पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे.
• मुसळधार पाऊस:-
महाराष्ट्रातील अनेक भागात दिनांक/ 26 जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून दोन दोन दिवसाचा मुक्काम घेत पाऊस अनेक भागात नदी, नाले वाहतील तसेच तळे आणि धरणात पाणी साठा वाढेल अश्या स्वरूपाचा मोठा पाऊस बरसणार आहे.
•दिनांक/ 14 ते 20 जुलै अंदाज:-
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीत दिनांक/ 14 ते 20 जुलै दरम्यान राज्यात दररोज मुसळधार पाऊस बरसणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन जसी उघड मिळेल तशी शेतीचे काम पूर्ण करून घ्यावे.
•पंजाब डख यांचा नवीन अंदाज कसा?
महाराष्ट्र राज्याचे लाडके हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून, दिनांक/ 26 जुलै पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे, कारण बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून दिनांक/ 14 ते 20 जुलै दरम्यान राज्यात मोठ्या पावसाचा (मुसळधार पाऊस) अंदाज असून राज्यातील अनेक छोटे मोठे तळे व धरणे भरतील असा अंदाज आहे.
• जुन पाऊस:-
यंदा जुन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. याही वर्षी 2023 खरीप सारखी परस्तीती आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला. जुन महिन्यात काही भागात चांगला पाऊस झाला तर काही भागात पाऊस झालेले नसून जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस.
• जुलै पाऊस:-
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी वाढली होती. परंतु पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले. परंतु दिनांक/ 7 जुलै पासून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून पूर पाहायला मिळाला आहे. तसेच जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.
• राज्यातील पीक जोमात:-
खरीप 2023 मध्ये एल निनोचा प्रभाव झाल्यामुळे गेल्यावर्षी अनेक भागात दुष्काळ पाहायला मिळाला होता. परंतु यावर्षी 2024 खरीप हंगामात एल निनोचा प्रभाव न्यूट्रल झाला असून यंदा चांगल्या पावसाचा अंदाज सुरुवातीपासून वर्तवण्यात येत आहे. यंदा पीक जोमात येतील असा अंदाज डख यांचा आहे धन्यवाद…