Havaman andaj 18 March 2024; पंजाबराव डख हवामान अंदाज राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आज दिनांक 14 मार्चपासून 18 मार्चपर्यंत वातावरण कोरडे (Dry weather) असेल उन्हाचा पारा चढता (Heat wave) असेल परंतु 18 मार्च नंतर राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची (Unsessional rain) शक्यता पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या राज्यातील काही भागात हरभरा, गहू, तूर यासारख्या पिकाची काढणी सुरू आहे त्यातच पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सतर्क केले आहे की राज्यात 18 मार्चपासून पावसाचा अंदाज आहे.
परंतु हा अंदाज विशेष पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आहे. मित्रांनो विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि बुलढाणा या जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.
शेतकरी बंधूंनो यंदा एल निनोचा प्रभाव असल्यामुळे सातत्याने तापमान वाढत असून समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान कमी जास्त होत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे यंदा अनेक अवकाळी पाऊस व अवकाळी गारपीट आपल्याला बघायला मिळाली आहे त्यातच या अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचे नुकसान देखील झालेले आहे.
मित्रांनो पुन्हा एकदा 18 मार्चपासून राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट असल्याची माहिती पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.
दिनांक 18 मार्चपर्यंत पश्चिम आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा काढणी करून घ्यावी. कारण वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विशेष सतर्क राहावे.
तसेच राज्यातील इतर परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही परंतु 18 मार्चपासून राज्यातील इतर भागांमध्ये म्हणजे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा द्राक्ष, टरबूज असेल अश्या शेतकरी बांधवांनी बुरशीनाशकाची फवारणी करणे सुद्धा गरजेचे आहे. तर मित्रांनो 18 मार्चपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज धन्यवाद.