Panjab dakh havaman andaj:- दिनांक 12 जुन पर्यंत या जिल्ह्यांना जोरदार पाऊस तर 14 ते 18 जुन पावसाची विश्रांती राहणार असल्याची शक्यता.
Maharashtra Rain Update:- हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 जुन पर्यंत वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यात दिनांक/ 09 जुन पासून मान्सून सक्रिय झाला आहे. दिनांक/ 09 ते 12 जुन राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. दिवसभर गर्मी आणि रात्री पाऊस अश्या स्वरूपाचा हा मान्सून असेल.
Panjab Dakh Rain Update;- पंजाबराव डख यांनी दिनांक/ 12 जुन पर्यंत राज्यात मान्सून सक्रिय राहणार असल्याची माहिती दिली आहे. या पावसाचा जोर सर्वाधिक कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे, तसेच दिनांक/ 12 जुन पर्यंत मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव या जिल्ह्यात पाऊस सक्रिय राहील त्याचबरोबर मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांना भाग बदलत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
•पावसाची विश्रांती:-
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 14 जुन पर्यंत मान्सून सक्रिय असेल, त्यांनतर 14 ते 18 जुन म्हणजे चार दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे, त्यांनतर दिनांक/ 18 जुन पासून पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
डख यांचा अंदाजानुसार राज्यात पावसाचा अंदाज भाग बदलत आहे, काही जिल्ह्यात कमी तर काही जिल्ह्यात मुसळधार अश्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी अतिघाई करू नये. जमिनीत वल भरपूर गेली असेल तर पेरणीचा निर्णय घ्यावा अशी माहिती डख यांनी दिली आहे.
•Heavy Rain District: मुसळधार पाऊस होणारे जिल्हे:-
संपूर्ण कोकण पट्टी, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, मुंबई, धुळे, संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे धन्यवाद..