Ration E-KYC; रेशन कार्ड धारकांनो सर्वात अधिक हे काम करा अन्यथा तुम्हाला रेशन मिळणे होणार बंद!

Ration Card E-KYC Required; आता रेशन पाहिजे असेल तर ई- केवायसी करावी लागेल..

ration adhar E-KYC last date
Ration Card E-KYC Required; आता रेशन पाहिजे असेल तर ई- केवायसी करावी लागेल..

Ration Adhar Link Must Important:- आता रेशन लाभार्थ्यांना आधार कार्ड सोबत रेशन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. कारण रोशन धान्य वाटप करण्यासाठी गोंधळ उडू नये त्यासाठी आधार आणि रेशन कार्ड एक मेका सोबत लिंक असणे बंधनकारक केले आहे. रेशन आणि आधार लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने अंतिक तारिक 30 सप्टेंबर पर्यंत केली असून त्याअगोदर शिधापत्रिका धारकांनी आधार लिंक करणे म्हणजे ई- केवायसी करणे बंधनकारक आहे.

One Nation One Ration Central Government Scheme वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत बोगस आणि मृत शिधापत्रिका धारकांचे रेशन बंद होणार आहे, कारण आधार आणि रेशन लिंक करणे गरजेचे असून यातून बोगस आणि मृत शिधापत्रिका धारकांना वगळण्यात येणार असून त्या व्यक्तींचे रेशन बंद करण्यात येणार असून गरजू आणि ई- केवायसी पूर्ण केलेल्या व्यक्तींना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

दिनांक/ 30 सप्टेंबर अगोदरच आधार आणि रेशन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला रेशन दुकानदार रेशन देणार आहे अन्यथा तुम्हाला रेशन मिळणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी.

• आधार आणि रेशन लिंक करणे का आहे बंधनकारक:-

शासनाकडून धान्याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ई- केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आसून, दिनांक/ 30 सप्टेंबर अगोदरच आधार आणि रेशन कार्ड लिंक करून घेण्याचा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिल्या आहेत. मित्रांनो तुम्हाला ई- केवायसी प्रक्रिया ही रेशन स्वस्त धान्य दुकानात सुद्धा करता येणार आहे. अनेक रेशन कार्ड लाभार्थी बोगस कार्ड चा वापर करून अनेक स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत आहे हे रोखण्यासाठी तसेच मृत शिधापत्रिका धारकांना वगळण्यासाठी ई- केवायसी करणे गरजेचे आहे, म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड प्रत्येक शिधापत्रिका धारकांना लिंक करणे बंधनकारक केले आहे. ई- केवायसी पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाच मिळणार स्वस्त धान्य दुकानातून लाभ अन्यथा 30 सप्टबेत नंतर तुमचे होणार रेशन बंद.

• शिधापत्रिका धारकांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करावी:-

ई- केवायसी प्रक्रिया फास्ट करण्यात यावी त्यासाठी रेशन दुकानात जाऊन तुम्ही आधार आणि रेशन कार्ड लिंक ही प्रक्रिया पूर्ण करू शकता, त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी ई- केवायसी प्रक्रिया 30 सप्टेंबर अगोदरच पूर्ण करून घ्यावी. अधिक माहितीसाठी रेशन दुकानदार सोबत चर्चा करावी आणि ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

• रेशन कार्ड हे देशातील अत्यंत महत्वाचे दस्तावेज झाले असून राज्यातील तेसेच देशातील कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे बंधनकारक झाले आहे, त्यामुळे देशातील नागरिकांनी रेशन आणि आधार कार्ड लिंक करून ई- केवायसी पूर्ण करावी तरच तुम्हाला स्वस्त धान्य दुकानातून लाभ घेता यानार आहे, तसेच अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ई- केवायसी फायदेशीर ठरणार आहे. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *