Shabari awas yojna 2024 :-
खुशखबर खुशखबर आज 11 जानेवारी 2024 शहरी भागातील घरकुलांना मिळणार 2.5 लाखांचे अनुदान. शबरी अवास योजने अंतर्गत आता शहरी भागातील घरकुलांना मिळणार 2.5 लाखांचे अनुदान.
अनुदान मिळण्याचे स्वरूप कसे आहे घराच्या कोणत्या स्टेज ला किती अनुदान मिळणार आहे तसेच शबरी योजने अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी कोण पत्र आहे. या योजनेसाठी काय कागदपत्र लागतील. अनुदान कास आणि किती दिलं जाणार आहे व अर्ज कशा पद्धतीने करावा त्याच बद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे.
Shabari awas Yojana scheme:-
मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या अश्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःच घर नाही, झोपड्यात किंव्हा कुडा मातीच्या घरात किंव्हा तात्पुरत्या तयार केलेल्या निवरात राहतात अश्या अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना शबरी योजने अंतर्गत घरकुला साठी 2.5 लाखाचे अनुदान देण्यात येणारं आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शबरी योजने चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता काय असावी ते खाली सविस्तर वाचा –
1- अनुसूचित जमातीच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
2- तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या स्वतःच्या नावावर पक्के घर नसावे.
3- शबरी योजने चा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावे.
4- तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी व घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची जमीन किंव्हा शासनाने दिलेली जमीन असावी.
5- शबरी योजने चा लाभ घेण्यासाठी तुम्ही यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
6- शबरी योजने चा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
7- स्वतःच्या नावाने बँक खाते असावे.
या वरील गोष्टी जर तुमच्याकडे पात्र असेल तर तुम्ही शबरी योजने चा लाभ घेऊ शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रुपये 3.00 लक्ष पर्यंत असावी.
घरकुल बांधकामाचे क्षेत्र हे 269 चौरस फूट एवढे राहील.
शबरी योजने अंतर्गत घरकुल अनुदान रक्कम ही एकूण 2.5 लाख रुपयांची मिळणार आहे परंतु ही रक्कम एकूण 4 टप्प्यात देण्यात येणार आहे.
टप्पा पहिला – घरकुल मंजुरी नंतर 40,000 रुपये दिले जाणार आहे.
टप्पा दुसरा – प्लिथ लेवल लां 80,000 रुपये दिले जाणार आहे.
टप्पा तिसरा – लिंटल लेवल ला 80,000 रुपये दिले जाणार आहे.
टप्पा चौथा – घरकुल पूर्ण झाल्या नंतर 50,000 रुपये दिले जाणार आहे.
शबरी योजने अंतर्गत एकूण चार टप्प्यात 2.5 लाखेचे अनुदान स्वरूपात मदन आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येईल.
शबरी योजने चा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे :
1- लाभार्थी अर्ज दराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो.
2- रहिवासी प्रमाणपत्र.
3- अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र.
4- घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंव्हा नाही यासाठी पुरावा.
5- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
6- शिधापत्रिका असावी.
7- आधारकार्ड असावे.
8- एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. (फोटो व खते क्रमांक असलेले)
अर्ज करण्याची पद्धत ही तुम्ही केलेला आर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशः / टपालाने / ईमेल द्वारे सादर करावा.
शबरी योजने चां लाभ घेण्यासाठी प्राधान्य :-
1- जातीय दंगलिमध्ये घराचे नुकसान झालेला व्यक्तींना प्राधान्य आहे
2- ॲट्रोसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्तींना प्राधान्य आहे.
3- विधवा किंव्हा परित्यकत्या महिला.
4- आदिम जमातीची व्यक्ती.
मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या अश्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःच घर नाही, झोपड्यात किंव्हा कुडा मातीच्या घरात किंव्हा तात्पुरत्या तयार केलेल्या निवरात राहतात अश्या अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना शबरी योजने अंतर्गत घरकुला साठी 2.5 लाखाचे अनुदान वरील माहिती प्रमाणे देण्यात येणार आहे.
मित्रांनो राज्यातील डेली योजना, शेती विषयक माहिती, बाजार समिती भाव व अचूक हवामान अंदाज दररोजच्या दररोज बघा धन्यवाद…