Skymet weather update 2024:- राम राम शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी. यंदा एल निनो होणार (Neutral) खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच एल निनोचा प्रभाव संपणार असल्याची माहिती स्कायमेट हवामान संस्थेने वर्तवली आहे.
Skymet havaman andaj 2024:-
शेतकरी मित्रांनो 2024 पाऊस कसा असेल त्याबद्दल स्कायमेट हवामान संस्थेने अंदाज वर्तवला आहे तरी खाली माहिती सविस्तर वाचा. मित्रांनो काही दिवसा पूर्वीच NOAA (National Oceanic and Atmospheric Administration) या हवामान संस्थेने सांगितले आहे की 2024 च्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव नसणार आहे. त्यामुळे यंदा सरासरी चांगला पाऊस होण्याची शक्यता नोआ या हवामान संस्थेने वर्तवली आहे.
तसेच स्कायमेट या हवामान संस्थेने देखील यंदा एल निनोचा प्रभाव कमी होऊन ला नीना सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा सरासरी 104 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव कायम असून यंदा उन्हाळी हंगामात उन्हाचा पारा वाढून उष्णतेची लाट येणार आहे. हा एल निनोचा प्रभाव मे महिन्याचे शेवट पर्यंत कमी होणार असून यंदा 2024 खरीप हंगामात जोरदार पाऊस बरसणार आहे.
खरीप 2023 मध्ये का पडला दुष्काळ?
शेतकरी मित्रांनो खरीप 2023 मध्ये एल निनोचा प्रभाव कायम सक्रिय होता त्यामुळे मागील वर्षात देशातील अनेक भागात दुष्काळाचे संकट पडले हेच संकट 2024 खरीप हंगामात राहील का अशी चिंता देशातील शेतकऱ्यांना पडली असून. त्यातच एक आनंदाची बातमी स्कायमेट या हवामान संस्थेने दिली आहे.
स्कायमेट हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार यंदा जुन पर्यंत म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एल निनोचा प्रभाव संपणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे एल निनो neutral होऊन ला नीना सक्रिय होण्याची दात शक्यता आहे.
सुपर एल निनोचा प्रभाव अधिक प्रमाणात राहिल्यास देशातील अनेक भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो त्यामुळे 2023 मध्ये देशातील अनेक भागात दुष्काळ पडला आहे.
स्कायमेट हवामान संस्थेने सांगितले आहे की यंदा एल निनोचा प्रभाव कमी होऊन खरीप हंगामात सरासरी किंव्हा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे धन्यवाद…