Thunderstorm alert 29 to 30 March:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमची स्वागत आहे. हवामान खात्याचा अलर्ट दिनांक 29 व 30 मार्च दरम्यान राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट (Thunderstorm) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता तसेच काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची (Hot Wave) लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
•Hot wave alert:-
दिनांक 29 व 30 मार्च दरम्यान विदर्भातील अकोला व बुलढाणा या दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. अकोल्यात 39 ते 40 अंश सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत असून अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच बुलढाणा 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिक देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
•Thunderstorm Alert-
आज दिनांक 29 व उद्या 30 मार्च दरम्यान राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जनावरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी.
•विदर्भ व मराठवाडा अलर्ट:-
दिनांक 29 मार्च दरम्यान विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडा पाहायला मिळू शकतात असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच 29 मार्च दरम्यान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात उष्णेतीची लाट तर लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
•दिनांक 30 मार्च विदर्भ व मराठवाडा हवामान अंदाज:-
विदर्भात उष्णतेची लाट येणार असून बुलढाणा व अकोला जिल्ह्यात जिल्ह्यात सर्वाधिक उन्हाचा पारा वाढणार आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच दिनांक 30 मार्च रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे धन्यवाद…