Today IMD Alert; आज फक्त याच जिल्ह्यांना धो धो पाऊस बरसणार!
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक/ 05 ऑगस्ट श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. दुपारचे दोन वाजले असून, आज कोण कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोणत्या जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपण नेहमीच वेळोवेळी राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक व हवामान विषयक माहिती अपडेट करत असतो, त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.
काल पडलेला पाऊस :-
राज्यात काल मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मागील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 100 ते 200 मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडलेला आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यांचा घाट माथ्यावरील भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी व घाटघर या सारख्या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
आजचा हवामान अंदाज 5 ऑगस्ट 2024 :-
आज मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज कसा आहे थोडक्यात घेऊ.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज :-
आज सकाळपासून मराठवाड्यात पावसाचा काहीसा जोर कमी झाला असून अनेक सूर्यदर्शन पाहायला मिळाले आहे. शेतकऱ्यांना फवारणी करता येईल असे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव वगळता परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे.
आज संपूर्ण मराठवाड्यात पावसाची उगडीप राहणार असून दुपार नंतर आणि रात्री परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
घाट माथा भागात काहीसा जोरदार बरसणार :-
आजही पुणे आणि सातारा घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला असून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नगर, पुणे आणि सातारा घाट माथ्यावर मागील अनेक दिवसापासून पावसाचा जोर कायम असून आजही काहीसा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
कोकणात पावसाचा अंदाज कसा :-
अनेक दिवसापासून कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग होत असून कोकणातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होत आहे तसेच आज दिनांक/ 05 ऑगस्ट आजही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला असून चांगला पाऊस बरसणार आहे.
नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात आजही जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी असून घाट परिसरात पाऊस होणार आहे.
विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज :-
अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला असून विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज :-
नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सांगली, सोलापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.