Todkar Havaman Andaj:- पुढील काही तासातच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता तोडकर हवामान अंदाज.
Big Monsoon Update:- आज 7 जुलै संध्याकाळचे सात वाजत आले असून पुढील काही तासातच राज्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. (Todkar Havaman Andaj Today).
तोडकर हवामान अंदाजानुसार राज्यात 8 आणि 9 जुलै दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात जोरदार पाऊस होणार असून मराठवाड्यात ही मध्येम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव जिल्ह्यात ही पावसाचा अंदाज आहे.
•हवामान खात्याचा अंदाज:-
आज 7 जुलै कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पाऊस होत असून 8 आणि 9 जुलै या दोन दिवसात पुन्हा पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता तोडकर यांनी व्यक्त केली आहे. तोडकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र सह उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
कालपासूनच कोकणातील काही भागात जोरदार पाऊस होत आहे तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पाहायला मिळाला आहे.
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात 7 जुलै रोजी जोरदार पाऊस पडला असून या जिल्ह्यातील अनेक भागात पुर आला आहे. 6 आणि 7 जुलै दरम्यान होत असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहे. दिनांक 6 आणि 7 जुलै रोजी विदर्भ, कोकण आणि मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून नागरिकांची गैरसोय झाली आहे. मागील 24 तासात 233 मिली मीटर सर्वाधिक पाऊस गुहागर या ठिकाणी झाला आहे.
दिनांक/ 7 जुलै रोजी कोकणातील बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिण्यात आला असून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, आणि विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी मेघ गर्जने सह जोरदार पाऊस बरसणार आहे.