Tur khat vyavasthapan; तूर पिकासाठी खताचा पहिला डोस कोणता आणि कधी द्यावा.

Tur Khat Vyavasthapan; तूर पिकाचे खत व्यवस्थापन कसे आणि कधी करावे संपूर्ण माहिती.

tur khat vyavasthapan
Tur Khat Vyavasthapan; तूर पिकाचे खत व्यवस्थापन कसे आणि कधी करावे संपूर्ण माहिती.

नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. तूर हे राज्यातील एक अत्यंत महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. गेल्या वर्षी तुरीचे लागवड कमी झाल्यामुळे तुरीला 10 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षाही अधिक भाव मिळाला आहे. त्यामुळे नक्कीच यंदा शेतकरी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करू शकता. तसेच तूर पिकाचे एकरी भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर तूर पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे? व कधी करावे? याबद्दल संपूर्ण माहिती असावी.

शेतकरी मित्रांनो तूर हे अधिक कालावधीचे पीक असून तूर हे पीक 165 ते 170 दिवसांनी काढणीस येते त्यामुळे तूर पिकाला खताचा पहिला डोस लागवडीपासून एक महिन्याच्या आत देणे गरजेचे आहे. तूर पिकाच्या सुरुवाती वाढीच्या अवस्थेत तूर पिकाची वाढ कमी होणे, तूर पीक पिवळे पडणे अश्या अनेक गोष्टी निसून येतात, त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे तूर पिकाला खत न देणे.

तूर हे पीक अधिक कालावधीचे असून प्रमुख कडधान्य पीक आहे, तुरीच्या दाण्यात प्रथिने भरपूर असल्यामुळे रोजच्या आहारात आपण याचा वापर करतो, तुरीची दाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

• तूर पिकासाठी नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित का करावा?

तूर हे कडधान्य (Pulse Crop) पीक आहे त्यामुळे या पिकाच्या मुळावर जिवाणूंच्या गाठी असतात या जिवाणूंच्या गाठी हवेतील नत्र झाडाला उपलब्ध करून देतात, त्यामुळे तूर पिकास नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित करणे गरजेचे आहे.

• तूर पिकास खताचा पहिला डोस कधी?

तूर पिकासाठी खताचा पहिला डोस तूर लागवडीपासून 25 ते 30 दिवसांनी दयावा. कारण ही तूर पिकाची वाढीची अवस्था असते. तसेच या अवस्थेत तूर पिकासाठी खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

• तूर पिकासाठी कोणते खत वापरावे:-

तूर पिकासाठी अश्या खताचा वापर करावा ज्या खतात नत्राचे प्रमाण कमी आहे, तसेच तूर पिकाचे उत्पादन वाढीसाठी गंधक युक्त खतांचा वापर करणे गरजेचे आहे. तूर पिकाचे पाहिले खत व्यवस्थापन करण्यासाठी 20-20-00-13 हे खत 50 किलो दयावे किंव्हा 12-32-16 हे खत 50 किलो दयावे. 20-20-00-13 तूर पीक उत्पादन वाढीसाठी योग्य ठरनार आहे कारण या खतात 13 टक्के गंधक आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही 12-35-16 किंव्हा 10-26-26 या खतांचा वापर करणार असाल तर या सोबत एकरी 10 किलो गंधक घेणे गरजेचे आहे धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *