Union Budget 2024; यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काय? पाहा पीएम किसान योजनेचा हप्ता वाढला का?

Union Budget 2024:- केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला असून, देशातील शेतकऱ्यांना काय मिळाले आहे पाहा.

अर्थसंकल्प 2024
Union Budget 2024:- केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला असून, देशातील शेतकऱ्यांना काय मिळाले आहे पाहा.

• मोदी सरकारच्या तीन टर्म मधील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या असून कर्ज माफी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ केंद्र सरकारने करावी अशी शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती. पण खरच कर्ज माफी आणि पी एम किसान योजनेबद्दल काही प्रतिसाद मिळाला का या लेखात पाहू…

• लोकसभा निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दराने सोयाबीन व कापुस पिकाची विक्री करावी लागली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खर्चही निघालेला नसून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजप सरकारवर नाराज असल्यामुळे लोकसभेत त्याचा परिणाम सरकारला दिसून आला.

• निर्मला सीतारमन यांनी काय घोषणा केल्या:-

अर्थमंत्री निर्मला सीतारमन त्यांनी कृषी साठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद कृषी क्षेत्रातील विकासासाठी केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी असून या वर्षी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला असून. शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेने 21.6 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

• कृषी तरतूद:-

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला असून कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली असून, कृषी क्षेत्रासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्प संसदेत सादर होताच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

• शेतकऱ्यांचा अपेक्षा:-

मोदी सरकारच्या तीन टर्म मधील पहिलाच अर्थसंकल्प संसदेत सादर होत असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, तसेच कर्ज माफी बद्दल कोणतीही घोषणा झालेली नाही. तसेच किमान आधारभूत किंमत MSP (Minimun Support Price) हमी भाव याबाबद अर्थसंकल्पात घोषणा व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

• 2024-25 आर्थिक वर्ष अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या पाहू..

कृषी क्षेत्रातील विकासासाठी बजेट वाढवण्यात आले असून 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बजेट वाढवले असून कृषी क्षेत्रात चांगलाच विकास पाहायला मिळणार आहे. तसेच एकूण पाच राज्यात किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील, तसेच कृषी उत्पादन वाढीसाठी आर्थिक सहाय्य व नैसर्गिक शेती वाढवण्यासाठी केंद्र सरकाचा भर राहणार आहे. तसेच जमिनीच्या नोंदीत 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती आणली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी सरकार 32 पिकाचे 109 नवीन वान विकसित करणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी हा मोठा निर्णय ठरू शकतो. तसेच भाजीपाला उत्पादकता आणि साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी भर दिला जाणार आहे. त्याच बरोबर तेलबिया आणि कडधान्य उत्पादन वाढीसाठी आणि साठवणीसाठी भर दिला जाणार आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *